Saturday, December 5, 2009

हवा पावसाळी


असा गार वारा... हवा पावसाळी
तुझ्या आसवांची हले का? डहाळी


असा कोणता गंध ये आसवांना
मनातून कोणी रुजुवात पाहे
पुन्हा कोंब येती नव्याने बीजाला
मुळामागुनी मूळ निशब्द धावे...
गती येत जाते तुझ्या चिंतनातून...
जुन्या वेदनांना नवी पालवी...


अशी शिळ घाली कोणी मनातून
निळा मेघ सांगे तुझा वारसा
खरे काय ते फक्त डोळ्यास ठावे
तुझा चेहरा हा मला आरसा
नदी खोल धावे ओलावणारी
आणि होत जाती उन्हे कोवळी
- कैलास गांधी

1 comment:

  1. कविता मस्त...









    एक निरिक्षण: या कवितेला मनाच्या श्लोकांची चाल बरोब्बर बसते! ;)

    ReplyDelete