Thursday, March 4, 2010

माझ्यावरी नाराज मी....

माझ्यावरी नाराज मी
हे सांगू कुणा आज मी

कंठात घुमे हुंदका
नि चोरला आवाज मी

सापळ्यावर घातला
चामड्याचा साज मी

तू नदीचा हुंदका
सागराची गाज मी

वक्षात किती चांदण्या
लावतो अंदाज मी

....कैलास गांधी

1 comment:

  1. वक्षात किती चांदण्या...... हे खुप आवडलं.

    ReplyDelete