
'पान' पिकले तरीही म्हणे
देठ अजून काबूत आहे.
'वारी' करायच्या वयात त्यांची
'ती' सवय शाबूत आहे.
म्हणून त्यांनी राजभवनाचा
रंगमहाल केला.
मिडीयाने उगाच याचा
गाजावाजा केला.
काय चुकले त्यांचे सांगा
सवाल माझा मार्मिक आहे.
नारायण, दत्त...असे त्यांचे
नाव सुद्धा धार्मिक आहे.
....कैलास गांधी
एकदम मार्मिक !
ReplyDeleteराठोड असो कि तिवारी हे सत्तेचे भोगी योगी बनून राज महालात बसले होते. उशीराका होईना त्यांच्यावर लाथ बसली ते बरं झालं.
ReplyDeleteसॉलिड!
ReplyDeletechapalakh!
ReplyDeleteएकदम नादखुळा
ReplyDelete'रंग'कर्मी तिवारी साहेबांना आणि तुमच्या प्रतिभेला कुर्निसात
ReplyDelete