Friday, March 12, 2010

देव मजला टाळतो आहे कधीचा....

हि कधी का वागण्याची रीत आहे
जो तो नुसता आपल्या धुंदीत आहे

मज तुझ्या रागावण्याचा धाक नाही
मी तुझ्या या आसवांना भीत आहे

हा उगाचच शोध नाही चाललेला
थांबलेली तू मला माहित आहे

देव मजला टाळतो आहे कधीचा
तो तरी माझ्या कुठे गणतीत आहे

सौख्य भेटायास आले फुरसतीने
मी म्हणालो, मी जरा घाईत आहे

रोज तुटतो अन पुन्हा बनतो कसा मी
कोण हा मज सारखा घडवीत आहे

....कैलास गांधी

3 comments:

  1. रोज तुटतो अन पुन्हा बनतो कसा मी
    कोण हा मज सारखा घडवीत आहे

    अपूर्णतेची कासावीशी व्यक्त करून पूढचा विस्तार रसिकांच्या भाववृत्तीवर सोडून देणारी सुंदर कविता..

    ReplyDelete
  2. soukha bhetayas aale ......ekdam jabardast.........!

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete