Monday, March 8, 2010

आणि मौन माझे निकालाप्रमाणे....

तुझा शब्द भक्कम पुराव्याप्रमाणे
आणि मौन माझे निकालाप्रमाणे

नवे रोज रस्ते नव्या रोज वाटा
तरी चालतो मी सरावा प्रमाणे

जशी गर्दी वाढे तसा भाव वाढे
सुरु मंदिरेही दुकाना प्रमाणे

तशी ओढ नाही जुने वेड नाही
तरी भेटतो मी सरावा प्रमाणे

....कैलास गांधी

2 comments:

  1. गझल रुपवतीही आणि अर्थवतीही...
    प्रत्त्येक शेर नव्या कवितेचा अनुभव देऊन जातो. तंत्र संभाळतांनाच आशयाशी सहजपणे बांधलेली गझल.... आवडली.

    ReplyDelete