Wednesday, November 11, 2009

दापोलीची वाताहात




दापोलित आज आलेल्या वादळ वारयाने दापोलीची वाताहत झाली.नैसगिक आपत्तिपासून सुरक्षित समजल्या जानारया दापोलिला आज तब्बल १८ वर्षानी पुन्हा तडाखा बसला.अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुक बंद झाली होती. तालुक्यात अनेक घरांवर झाडे पडल्याने करोडोंची वित्तहनी झाली. विजेचे खांब जागोजागी कोसळल्याने . विज यंत्रणा सुरक्षित होण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. दापोली बाज़ार पेठेतुंन जाणाऱ्या मार्गावर झाडे कोसळल्याने बाज़ार पेठ आज दिवसभर बंद होती. वायरलेस यंत्रणेचा टॉवर कोसळल्याने पोलिसांची वायरलेस यंत्रनाही कोलमडली.कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरीही करोडो रुपयांची वित्त हानी झाली आहे।सुमारे ५०० घरांना धोका पोहोचला आहे. याचे सर्वेक्षण करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधि लागणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे. तालुक्यात सुमारे १५०० हुन अधिक झाडे कोसळली आहेत.

1 comment:

  1. अरेरे!
    वादळात कोकणाला जोरातच फटका बसला. तुम्ही व्यवस्थित आहात ना? घरापाशी काही पडझड, नुकसान वगैरे नाही ना?

    ReplyDelete